ड्रीम इंडिया नेटवर्क प्रोजेक्टद्वारे आनंद फाउंडेशन , रिया फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने लैंगिक अल्पसंख्याकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .
लीना टोपनावर म्हणाल्या लैंगिक अल्पसंख्याक या प्रशिक्षणाद्वारे ते स्वावलंबी आणि स्वाभिमानाचे जीवन जगू शकतात, लैगिक अल्पसंख्याक प्रशिक्षण घेऊन इतरांसाठी रोजगार निर्माण करू शकतात असे सांगितले .
या प्रशिक्षणात टेलरिंग ब्युटी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले
प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी डॉ.परविना शेख होत्या. महिला व बालकल्याण विभागाच्या प्रभारी रूपा पवार, अतिथी म्हणून महेश कदम, मिलिंद पाटणेकर, दिनेश पाटील, राजकुमार सुणगार आदी उपस्थित होते


Recent Comments