माळमारुती पोलीस स्टेशन अंतर्गत शिवबसवनगर येथे नागराज इराप्पा गाडीवड्डर या तरुणाची कोणीतरी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती , या प्रकरणी माळमारुती पोलिसांनी मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत .
व्हॉइस ओव्हर ; डीसीपी शेखर एच टी, यानाच्या मार्गदर्शनाखाली , प्रकरणाचा तपास करण्यासाठी. बेळगाव शहर मार्केट उपविभाग एसीपी एन.व्ही. बरमणी, आणि माळमारुती सीपीआय जे.एम. कालीमिर्ची, यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले आणि या पथकाला संशयित आरोपींबाबत सुगावा लागला आणि ते महाराष्ट्र राज्य कोल्हापूरच्या एलसीबीकडे गेले. दोन आरोपींच्या सहकार्याने प्रथमेश धमेंद्र कसाबकर वय :
20 वर्षे वय : राजारामपुरी कोल्हापूर, आकाशाकडप्पा पवार वय : 21 वर्षे : राजारामाचौक अ प्रभाग कोल्हापूर यांना कोल्हापुरात अटक करून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. , या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे . पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत घेण्यात येणार आहे. फरारझालेल्या मुख्य आरोपीला पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मार्केट उपविभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना एसीपी: नारायण भरमणी, पोलिस निरीक्षक कालीमिर्ची, पीएसआय होनाप्पा तलवार, श्रीशैल आणि कर्मचारी सदस्य कुंडेद , चिन्नाप्पगोळ, बस्तवाड, गुराणी, होसमनी आणि मुजावर, ज्यांनी संवेदनशील प्रकरण शोधण्याच्या कारवाईत भाग घेतला, बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.


Recent Comments