ऊस दरावरून माहिती अधिकार कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. कर्नाटकात दारूचे दर जास्त आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या उसाला कमी दर दिला जात असून हा भेदभाव दूर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांच्या उसाला जास्त भाव देऊन दारूची किंमत कमी केली आहे, पण कर्नाटकात मात्र शेतकर्यांनी पिकवलेल्या उसाला सरकारने कमी दर दिला असून दारूची किंमत मात्र वाढवली आहे. यातून सरकार शेतकरी आणि दारूप्रेमींवर अन्याय करत असून, हा भेदभाव त्वरित दूर करावा. अन्यथा सरकारविरोधात तीव्र लढा देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गेल्या 5 वर्षात राज्याच्या तिजोरीत उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे 1 लाख 21 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. तरीही कर्नाटकात उसाला अत्यल्प दर देऊन सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. याविरोधात कायद्यानुसार लढा देऊ, असा इशारा भीमाप्पा यांनी गडाद सरकारला दिला आहे.


Recent Comments