Belagavi

मी लोकसभा लढवणार नसल्याचे भालचंद्र जारकीहोळी यांचे विधान

Share

भाजपमधून एकही आमदार काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे आ . भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले .
बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले कि , काँग्रेस सरकारमधील आमदारांच्या नापसंतीच्या पत्राविरोधात भाजप आमदारांना घाबरवण्याची रणनीती अवलंबत आहे. ते म्हणाले की, भाजपमधून एकही आमदार काँग्रेसमध्ये जाणार नाही.

आता पुन्हा जिल्हा विभाजनाचा घोळ वाढला आहे. गोकाक आणि चिक्कोडी हे प्रशासकीय दृष्टिकोनातून नवे जिल्हे व्हायला हवेत, असे ते म्हणाले.
मोदींच्या करिष्म्यावर लोकसभा निवडणूक होणार आहे. मी लोकसभा लढवणार नाही. पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्या बाजूने आम्ही सर्वजण काम करू, असे ते म्हणाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत गटबाजीमुळे निकाल आमच्या विरोधात लागला होता. बेळगाव जिल्ह्यात गटबाजी नाही. मोदींच्या करिष्म्याच्या जोरावर भाजप लोकसभा निवडणूक जिंकेल, असे ते म्हणाले.

Tags: