नागपंचमीनिमित्त नागदेवतेच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करून दूध वाया घालविण्याऐवजी तेच दूध रुग्ण आणि बाळंतीण महिलांना वाटण्याचा स्तुत्य उपक्रम बसवप्रकाश स्वामीजी आणि काँग्रेस युवा नेते राहुल जारकीहोळींनी आज राबवला.
होय, नागपंचमीनिमित्त नागदेवतेच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करून दूध वाया घालविण्याऐवजी तेच दूध रुग्ण आणि शालेय विध्यार्थ्यांना देण्याचा स्तुत्य उपक्रम बसवप्रकाश स्वामीजी गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव जिल्ह्यात राबवत आहेत.
त्याला जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी साथ दिली आहे. आज त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुत्र युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी बसवप्रकाश स्वामीजींसोबत बेळगाव जिल्हा सरकारी बीम्स इस्पितळात हा उपक्रम राबवला.
बीम्स इस्पितळातील रुग्णांना आणि प्रसूती विभागात बाळंतिणींना राहुल जारकीहोळी आणि बसवप्रकाश स्वामीजींनी दुधाची पाकिटे आणि बिस्कीट व फळांचे वाटप केले. यावेळी रुग्ण आणि बाळंतिणींच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसून आले.
एकंदर, नागपंचमीनिमित्त नागदेवतेच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करून दूध वाया घालविण्याऐवजी तेच दूध रुग्ण आणि बाळंतिणींना देण्याचा स्तुत्य उपक्रम बसवप्रकाश स्वामीजी आणि राहुल जारकीहोळी यांनी राबवून समाजापुढे आदर्श ठेवलाय असेच म्हणावे लागेल.


Recent Comments