सर्वलोक सेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विरेश हिरेमठ यांनी बेळगाव जिल्हा बीम्स इस्पितळात शाल आणि फळे वाटपाचा उपक्रम राबवला.
बेळगावच्या सामाजिक क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवून अल्पावधीत नावारूपास आलेल्या सर्वलोक सेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विरेश हिरेमठ यांनी आज आणखी एक समाजोपयोगी उपक्रम राबवला.
2013 पासून विविध स्वामीजी आणि मठाधीशांकडून त्यांच्या सत्कार समारंभात प्राप्त झालेल्या शाली आणि फळे बीम्स जिल्हा इस्पितळातील प्रसूत शिशू आणि मातांसाठी वाटली.
इन न्यूजशी बोलताना ते म्हणाले की, “मी सातत्याने सामाजिक कार्य करत आलो आहे. हुक्केरी हिरेमठचे श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी माझ्या सामाजिक कार्याचे कौतुक करून सर्वप्रथम मला आशीर्वाद दिला. तेथून सुरुवात होऊन अनेक मठाधीशानी व मान्यवरांनी मला सत्कार करून आशीर्वाद दिला. या सत्कार समारंभात मिळालेल्या शालींचा मला उपयोग नाही.
अशा शाली देवांचे स्वरूप असणाऱ्या स्वामीजींनी मला दिल्या. मुलांनाही देवाचे स्वरूप मानले जाते, त्यामुळे देवाकडून मिळालेल्या शाली पुन्हा देवालाच अर्पण करण्यासाठी मी त्या देवाच्या प्रतिमेतील मुलांना समर्पित केल्या आहेत. याचे कारण हुक्केरी हिरेमठ स्वामीजींचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले.
बीम्स हॉस्पिटलचे गुणवत्ता व्यवस्थापन अधिकारी रमेश संकरट्टी यांनी विरेश हिरेमठ यांच्या उपक्रमाचा प्रारंभ करून या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांनी आज आमच्या बीम्स हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्याकडे आलेल्या शाली आणि फळांचे वाटप प्रसूती विभागातील नवजात शिशू आणि मातांसाठी दिल्या.
असे आणखी समाजकार्य करण्यासाठी ईश्वर त्यांना आणखी शक्ती देवो. सामाजिक कार्य करून वीरेश हिरेमठ अनेक गरीब लोकांना मदत करत आहेत, बीम्स हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो असे त्यांनी सांगितले. यावेळी बीम्स रुग्णालयातील कर्मचारी व इतर उपस्थित होते


Recent Comments