बेडकिहाळ गावातील मोहिते शेतातील महादेव मोहिते यांच्या 5 शेळ्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मरण पावल्या. एक शेळी जखमी झाली आहे. अंदाजे 60 हजार रु. नुकसान झाले आहे .
महादेव मोहिते हे कुटुंबासह गावी गेले होते. यावेळी बागेत कोणीही नसल्याने कुत्र्यांच्या टोळक्याने शेळ्यांवर हल्ला केला.
मोहिते शेतातील वातावरणात याआधीही तीन वेळा भटक्या कुत्र्यांनी म्हशी व गायीच्या वासरांवर हल्ला केला असून, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.


Recent Comments