केंद्र सरकारच्या “माझी माती माझा देश ” या अभियानांतर्गत , वृक्षारोपण तसेच बेळगावच्या दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक उद्घाटन कार्यक्रम , किल्ला तलावाजवळील तिरंगा प्रांगणात पार पडला .
देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त , केंद्र सरकारच्या नूतन , माझी माती माझा देश या अभियानांतर्गत, देशातील प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या वतीने , हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे . बेळगाव महानगर पालिकेतर्फे , आज खा . मंगला अंगडी यांच्या उपस्थतीत किल्ला तलावाजवळील तिरंगा प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
बेळगावमध्ये नुकतेच निधन झालेल्या गंगाप्पा माळगी , नागाप्पा मास्ती, आनंद चिकोडी बाबू अष्टेकर , परशुराम पाटील , भारत मास्की , रावसाब कनकरेड्डी , मनोहर गानाचारी अशा स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करून वंदन करण्यात आले .
तसेच ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण देखील करण्यात आले .
यावेळी बोलताना , खा . मंगला अंगडी आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी जे बलिदान दिले आहे त्यांचे बलिदान व्यर्थ न होता , देश आणखी प्रगती करू देत . सर्वानी एकजुटीने राहून देशाला आणखी बळकट बनवावे असे आवाहन केले .
यावेळी महापौर शोभा सोमनाचे , उपमहापौर रेशमा पाटील , स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी , महानगर पालिकेचे आयुक्त अशोक गुडगुंटी , भाग्यश्री हुग्गी , लक्ष्मी निप्पाणीकर , मनपाचे नगरसेवक , अधिकारी तसेच विविध विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते .


Recent Comments