स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कॅम्प परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगाव व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्प दर्गा मैदान येथे सुमारे २५० झाडे लावण्यात आली .
यावेळी बोलताना कॅंटोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांनी सांगितले कि , स्वातंत्र्यदिनानिमित्त , वन खात्याच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम आज कॅम्प भागातील दर्गा मैदानावर आयोजित करण्यात आला होता . वखात्याकडून यावेळी २५० रोपे देण्यात आली होती . पुढील भविष्यासाठी , ऑक्सिजनसाठी , तसेच पावसासाठी झाडे लावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले .
यावेळी आरएफओ पुरषोतम राव, उप परिक्षेत्र अधिकारी विनय गौडर , गिरीश बेन्नाड
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख, डॉ राहिला शेख. प्रियंका पेटकर, नाज बदामी , रियाझ मुजावर आणि इतर यावेळी उपस्थित होते


Recent Comments