बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज सकाळी सकाळी 5.45 वाजता गॅरेजला भेट दिली आणि शासनाच्या आदेशानुसार सर्व वाहनधारकांसोबत “हर घरा तिरंगा” सेल्फी फोटो लिंकवर पाठवला.
तर किल्ला तलावाजवळील कार्यालयाच्या नागरी सेवकांसोबत राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढली .
त्यानंतर महांतेश नगर येथील इंदिरा कॅन्टीनला भेट दिली व त्यानंतर जुने व नवीन गांधी नगरचे प्रभाग नगरसेवक अजीम पटवेकर यांच्यासोबत प्रभागातील स्वच्छता, विद्युत व ड्रेनेजची पाहणी करून काम करणाऱ्या ठेकेदाराला दंड करण्याच्या सूचना दिल्या. साफसफाईचे काम व्यवस्थित करा आणि नोटीस देखील जारी करा. अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या .
किल्ला तलाव येथे ” माझी माती माझा देश ” अंतर्गत शासनाच्या ठोस आदेशानुसार , ७५ औषधी वनस्पतींची लागवड कलेल्या ठिकाणाची पाहणी केली.


Recent Comments