Belagavi

कोतवाल गल्ली, जालगार गल्ली ड्रेनेज समस्या निवारणाचे काम सुरु

Share

बेळगाव शहरातील कोतवाल गल्ली, जालगार गल्ली ड्रेनेज समस्या निवारणाच्या कामाला आज पोलीस संरक्षणात प्रारंभ करण्यात आला.

बेळगाव शहरात पाऊस जास्त झाला तर गटारी भरून पाणी या भागातून वाहत जाऊन कोतवाल गल्ली भागातील घरात घुसत होते. त्यामुळे त्या भागातील लोकांनी कोतवाल गल्लीच्या मुख्य रस्त्यावरून येणारे पाणी रोखण्यासाठी कोतवाल गल्लीच्या कोपऱ्यावरील गटार बंद केले होते. त्यामुळे काही दिवसांपासून येथील ड्रेनेज चेंबर भरून रस्त्यावर पाणी वाहत होते. अनेकवेळा या समस्येमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांत यावरून काल वादही निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

दरम्यान, आज शुक्रवारी मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन या समस्येचे निवारण केले. आ. राजू सेठ यांच्या आदेशावरून जालगार गल्ली आणि कोतवाल गल्ली या दोन्ही बाजूने सीडी वर्क करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी कोणताही

अनुचित प्रकार घडू नये यासाठी मार्केट स्थानकाच्या पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या संरक्षणात हे काम सुरु करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक मुजम्मिल डोणी आणि अफरोज मुल्ला तसेच मनपा अधिकारी उपस्थित होते.

Tags: