बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी पालिकेच्या कार्यालयांना भल्या पहाटे भेटी देऊन कचरा उचल व अन्य कामांवर देखरेख ठेवण्याचा उपक्रम सुरूच ठेवलाय. आज शुक्रवारी पहाटेसुद्धा त्यांनी सदाशिवनगर कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली.
मनपा आयुक्त दुडगुंटी यांनी आज पहाटे 5-30 वाजता स्वत: कचरा वाहनात बसून सदाशिव नगर येथील वाहन शाखेत गेले, वाहनांची तपासणी करून वाहनचालकांची उपस्थिती तपासली. चालक व क्लिनर्सना सकाळी 5.45 वाजता कामावर हजर राहून कर्तव्य चोख बजावण्याचे निर्देश दिले. किल्ला तलावाजवळील बिट कार्यालयास भेट देऊन पौरकार्मिकांची उपस्थिती तपासण्याचे निर्देश आरोग्य निरीक्षकांना दिले. त्यानंतर त्यांनी नगरसेविका अफरोज मुल्ला यांच्यासमवेत प्रभाग क्रमांक 5 मधील खडेबाजार आणि दरबार गल्लीतील कचराकोंडीचा आढावा घेतला.
संबंधित निरीक्षकांना योग्य ते निर्देश देण्यात आले व जनतेच्या तक्रारींवर चर्चा करून सर्व संबंधितांना निर्देश देण्यात आले.
त्यानंतर कोतवाल गल्ली आणि काकर गल्ली भाजी मंडईला भेट दिली. भाजी मंडईत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्याच दिवशी रात्री 9 नंतर विल्हेवाट लावण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. मग पै हॉटेलला भेट देऊन तेथील ओला कचरा प्रक्रिया संयंत्राची पाहणी केली.
त्याचप्रमाणे, त्यांनी पर्यावरण अभियंत्यांना एक बैठक बोलावून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांना निर्देश देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.
त्यानंतर मनपा आयुक्त दुडगुंटी यांनी रुक्मिणी नगरसेवकांसह रुक्मिणी नगर प्रभागात भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित आरोग्य निरीक्षकांना स्वच्छता राखण्याचे निर्देश दिले.
महापालिका आयुक्तांच्या या कामाचे शहरातील नागरिकांनी कौतुक केले.


Recent Comments