Vijayapura

अलमट्टी डावा कालवा ओव्हरफ्लो झाल्याने फुटून शेतीचे प्रचंड नुकसान

Share

उत्तर कर्नाटकातील अलमट्टी येथे डाव्या काठाचा मुख्य कालवा फुटला. मोठ्या प्रमाणात कालव्याचे पाणी शेतीत शिरल्याने 200 एकर पेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली आहे. मक्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

ही घटना विजयपूर जिल्ह्यातील मुड्डेबिहाळ तालुक्यातील हरिंद्राल गावाजवळ घडली असून केबीजेएनएलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . कालवा फुटलेल्या ठिकाणी जेसीबीने माती टाकून फुटलेला कालवा बुजवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

निकृष्ट कामामुळे कालवा फुटल्याचा आरोप स्थानिकांनी केला. कालव्याची दुरुस्ती करून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: