Belagavi

मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांकडून मदतीचा धनादेश

Share

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील बेक्कीनकेरे गावातील भरमा चिक्के यांचा शेतात उसाच्या पिकावर फवारणी करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. समाजकल्याण, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष अपंगांचे सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चिक्के कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि नुकसानभरपाईचा धनादेश सुपूर्द केला.

: भरमा चिक्के यांना शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या पत्नीही मानसिक अस्वस्थ होऊन तिचाही मृत्यू झाला. त्यामुळे

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, भरमा विजेच्या धक्क्याने आणि पाठोपाठ त्यांच्या पत्नीचाही मानसिक आजाराने मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले.
त्याचवेळी त्यांनी सरकारकडून पाच लाख रुपये भरपाईचा धनादेश कुटुंबीयांना सुपूर्द केला. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: