Belagavi

श्री सरस्वती वाचनालयातर्फे अधिक मासानिमित्त संगीत संमेलन

Share

शहापूर-बेळगांव येथील श्री सरस्वती वाचनालयाच्या संगीत कला मंच विभागातर्फे अधिक मासानिमित्त “कृष्णं वंदे जगद्गुरुम्” भक्तिगीत व भजन सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

रविवारी काळी वाचनालयाच्या श्रीमती माई ठाकुर सभागृहात झालेल्या भक्तिगीत व भजन सेवा कार्यक्रमात गायक प्रभाकर शहापूरकर, गुरुराज कुलकर्णी यांनी गायनसेवा सादर केली. त्यांना तबलासाथ राहुल मंडोळकर, संवादिनीवर वामन वागूकर, टाळ सुधीर बोंद्रे यांनी साथ दिली.

दीप प्रज्वलन व विठ्ठल पूजन वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. सौ. स्वरूपा इनामदार, गुरुराज कुलकर्णी, प्रभाकर शहापूरकर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. सौ. स्वरूपा इनामदार यांनी

सविता पारनट्टी, अध्यक्षा प्रा. सौ. स्वरूपा इनामदार यांनी परिचय करून दिला. यावेळी स्वेदा सांगलीकर, वामन वागूकर, राहुल मंडोळकर, गुरुराज कुलकर्णी, प्रभाकर शहापूरकर, कुबेर गणेशवाडी यांचा वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. फ्लो
यावेळी इन न्यूजशी बोलताना वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. सौ. स्वरूपा इनामदार यांनी सांगितले की, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ, प्रोत्साहन मिळावे यासाठी सरस्वती वाचनालयातर्फे दरवर्षी कुमार गंधर्व संगीत संमेलन, दर दोन महिन्यांतून एकदा संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याशिवाय भरतनाट्यम, सितारवादन आदी उपक्रमही राबविण्यात येतात.

सूत्र संचालन सविता पारनट्टी यांनी केले. वाचनालयाला कन्नड पुस्तके देणगी दिल्याबद्दल विजयपूर येथील विजयराव महाजन, सरिता महाजन विजापूर यांचा विशेष सकार करण्यात आला.

Tags: