Belagavi

Scam 2003 The Telgi Story Teaser

Share

अब्दुल करीम तेलगीवर येणार वेब सिरीज; ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा टीझर प्रदर्शित
‘स्कॅम १९९२’ नंतर देशातील सर्वात मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची कहाणी आता प्रेक्षकांना सीरिजच्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमधून वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

‘स्कॅम २००३’ हा भारतातील सर्वात मोठा स्टॅम्प पेपर घोटाळा म्हणून ओळखला जातो. या सीरिजची संपूर्ण कथा अब्दुल करीम तेलगीवर आधारित असणार आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचे कथानक पत्रकार आणि वृत्तनिवेदक संजय सिंह यांच्या ‘रिपोर्टर्स डायरी’ या हिंदी पुस्तकातून घेण्यात आले आहे.

स्टॅम्प पेपर छापण्यासाठी लागणारी यंत्रे, ही यंत्रे विकत घेण्यासाठी तेलगीने बँका, विमा कंपन्या आणि इतर अनेकांची कशाप्रकारे फसवणूक केली. ३०० हून अधिक लोकांना कामावर ठेवले. या सगळ्यात जवळपास ३० हजार कोटींचा घोटाळा झाला होता. यावर आधारित सीरिजचे कथानक असेल असे टीझर पाहिल्यावर लक्षात येते. टीझरमधील “मला पैसे कमावण्याची हौस नाही कारण, पैसे कमावले नाहीतर बनवले जातात” हा संवाद लक्ष वेधून घेतो.

‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही सीरिज २ सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होईल. या सीरिजची निर्मिती हंसल मेहता यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. सीरिजमघ्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका अभिनेते गगन देव रियार साकारणार आहेत.

Tags: