Belagavi

कचराकुंड रोखण्यासाठी पालिका आयुक्तांचा नवा प्लॅन, त्याजागी लावणार रोपे

Share

बेळगाव शहरातील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी त्या ठिकाणी रोपलावण करण्याची योजना मनपाने आखली आहे. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या सूचनेवरून गॅंगवाडीतील दुभाजकांवर शोभेची रोपे लावण्यात आली.

बेळगाव शहरात अनेक ठिकाणी नागरिकांकडून मनपाच्या खुल्या जागांवर किंवा रस्त्याकडेला कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे अशी ठिकाणे ओळखून त्या ठिकाणी शोभेची व अन्य रोपे लावण्याची योजना महानगरपालिकेने आखली आहे.

मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या सूचनेनुसार ही योजना राबविण्यात येत आहे.

त्यानुसार शहरातील गॅंगवाडी भागात दुहेरी रस्ता दुभाजकाच्या शेजारी कचरा टाकू नका असे सांगून दुभाजकावरील ब्लॅकस्पॉट साफ करून २५ रोपे लावण्यात आली.

Tags: