प्रत्येक माणसाने आपला स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी काम केले पाहिजे असे आवाहन अलायन्स इंटरनॅशनल क्लबच्या आंतरराष्ट्रीय डायरेक्टर नवीना शेट्टीगार यांनी केले.

बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये अलायन्स क्लब बेळगाव स्मार्टसिटी या क्लबच्या अधिकार ग्रहण समारंभात त्या नवीन कार्यकारिणीला अधिकार सूत्रे प्रदान केल्यानंतर बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, समाजासाठी काम करण्याची इच्छा असेल तर कोणत्याही व्यासपीठाची गरज नाही, जिथे गरज, जरुरी आहे. तेथे माणुसकीच्या दृष्टीतून मदत केली पाहिजे. पण काही घटकांपर्यंत आपण एकटे पोहोचू शकत नाही तेथे अशा संस्था व क्लबच्या माध्यमातून आपले योगदान दिले पाहिजे. अलायन्स क्लबनेही अशाच पद्धतीने कमी कालावधीत अनेक सामाजिक, शैक्षणिक कामे केली आहेत आणि तुम्हाला आता समाजसेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा उपयोग करून घ्या आणि समाजाच्या विकासात हातभार लावा असे आवाहन त्यांनी केले.
या क्लबचे नूतन अध्यक्ष म्हणून प्रभाकर शेट्टी, सचिव मीनल कालकुंद्रीकर, व पदाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आला. यावेळी अलायन्स क्लबचे संस्थापक जिल्हा प्रांतपाल दिनकर शेट्टी यांच्या उपस्थितीत शपथ
तसेच नवीन सदस्यांना बॅच प्रदान करण्यात आले.
यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या पंचाक्षरी श्रीशैल हिरेमठ, डॉ. अल्पेश थोपराणी, मेदिनी शेट्टी, संतूर भास्कर शेट्टी, उदय शेट्टी, प्रसन्ना शेट्टी, बसवराज कोळी, अनिल कविशेट्टी, डॉ. लक्ष्मण जंबगावी, ऍडव्होकेट एम. एम. दोडमनी आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे दहावी परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या सेंट जोन्स आणि सेंट पीटर्स शाळेच्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
प्रियांका इनामदार आणि मीनल कालकुंद्रीकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अलायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments