बेळगावमधील महांतेश नगर येथील रस्त्याचे निकृष्ट कामकाज पावसाने उघड केले आहे . अनेक ठिकाणी रस्त्याची खडी उखडून , मोठमोठे खड्डे पडले आहेत . त्यामुळे या रस्त्यावर रोज एक ना एक अपघात होत आहे .
स्मार्ट सिटी बेळगावमधील महांतेश नगरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे . या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत . या रस्त्यावर वाहनांची मोठ्या वर्दळ असते . रस्त्यातील खड्डे पावसाच्या पाण्यामुळे दिसून येत नसल्याने या ठिकाणी दररोज अपघात घडत असतात . येथील कनकदास सर्कल हे मुख्य सर्कल असून त्या ठिकाणी देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत .
वाहनधारकांना कसरत करीत या रस्त्यावरून जावे लागते . इथल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामकाजाबद्दल नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . कोणाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार काय असा प्रश्न वाहनधारक करीत आहेत .
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे .


Recent Comments