Belagavi

बेळगावच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यानी घेतला मोकळा श्वास

Share

बेळगावची मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपत गल्ली , खडेबाजार येथील रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण रहदारी पोलिसांनी हटवून , रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला .


ट्रॅफिक सीपीआय विनायक बडिगेर तसेच पीएसआय लक्ष्मण करीगौडर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली . शहरातील मुख्य बाजारपेठेतील गणपत गल्ली येथे , किरकोळ विक्रेते , फळ विक्रेते , तसेच अन्य विक्रेत्यांनी आणि फेरीवाल्यांची रस्त्यावर अतिक्रमण करून आपले व्यवसाय थाटले होते . यामुळे वाहनधारकांसहित , पादचाऱ्यांना देखील या रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले होते . वारंवार या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती . आता पावसाळा सुरु असल्याने , तर हा त्रास आणखी वाढला होता . याची दखल घेऊन सीपीआय विनायक बडिगेर तसेच पीएसआय लक्ष्मण करीगौडर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता अतिक्रमण हटाव मोहीम राबवून , रस्ता मोकळा करण्यात आला .
,त्याचप्रमाणे खडे बाजार , चित्रा टॉकीज रोड , रामलिंगखिंड गल्ली या ठिकाणचे देखील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले .
या कारवाईत सिकंदर, सुभाष हादीमणी, आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला . रस्त्यानी मोकळा श्वास घेतल्याने , पादचाऱ्यांसहित वाहनधारक देखील खुश झाले आहेत .

Tags: