श्री एकदंत युवक मंडळ, समर्थनगर व डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्या संयुक्त विद्यमाने डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधात्मक होमीओपॅथीक लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
श्री एकदंत युवक मंडळ, समर्थ नगर व डॉक्टर प्रकाश राजगोळकर यांच्या संयुक्त विद्यमाने गेली सलग 12 वर्षे समर्थनगर व मल्लिकार्जुन नगर परिसरातील रहिवाशांसाठी आयोजीत डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधात्मक होमीओपॅथीक लसीकरण मोहीम करण्यात येते. यासाठी श्री एकदंत युवक मंडळाचे कार्यकर्ते तसेच डॉक्टर प्रकाश राजगोळकर यांनी विशेष प्रयत्न करत असतात. त्यानुसार आज हे शिबीर घेण्यात आले.
या लसीकरणाच्या आधी या रोगांबाबत घ्यावयाची दक्षता यावर डॉक्टर प्रकाश राजगोळकर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. नंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पुजन करून श्री फळ वाढविण्यात आले.

यानंतर श्री एकदंत युवक मंडळाकडून डॉक्टर प्रकाश राजगोळकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भरतेश कॉलेजचे विद्यार्थी, समर्थनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.


Recent Comments