शहरातील 58 प्रभागांसाठी महापालिकेत 530 सफाई कामगारांची नोंद आहे. त्यांच्या जोडीला 35 स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे, कुणीही कामचुकारपणा करु नये. शहर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे अशी सूचना आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रवी धोत्रे यांनी केली.
आरोग्य स्थायी समितीची बैठक बेळगाव महापालिकेत झाली. त्यावेळी ते बोलत होते. जयंत जाधव, रेश्मा कामकर, श्रेयस नाकाडी शंकर पाटील, रमेश मैलवगोळ व्यासपीठावर होते. नव्याने अस्तित्वात
आलेल्या सभागृहातील एखाद्या स्थायी समितीची ही पहिलीच बैठक होती. तसेच समितीतील बहुतांश सदस्यही नवखे असल्याने बैठकीबाबत उत्सुकता होती. मात्र, ही बैठक यशस्वीपणे पार पाडण्यात आली. फ्लो अध्यक्ष रवी धोत्रे यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना करून त्यांचे पालन करण्याची सूचना केली. सहा वर्षे तुम्ही काय केले. याबाबत मी विचारणार नाही. मात्र, यापुढे स्वच्छता कामाच्या बाबतीत तुमची गय केली जाणार नाही. तुम्हाला पगार थेट खात्यात मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. दोन प्रभागांना मिळून एक निरीक्षक नेमण्यात आला आहे. ऑफलाईन काम करणाऱ्या सफाई कामगारांचे सर्वेक्षण मी सुरू करणार आहे. आपले शहर स्वच्छ व सुंदर बनवण्याचे काम तुमच्या हातात आहे. ते तुम्ही चोखपणे करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

कामगारांनी गणवेश घालूनच कचरा उचल करावी. शहरात अजूनही ब्लॅक स्पॉट आहेत. त्यांची यादी बनवून ते तत्काळ हटवा. त्या भागातील लोकांना कचरा संकलन करून स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे देण्याची सूचनाही करण्यात आल्या.
यावेळी 35 आरोग्य निरीक्षकांसह सफाई कर्मचारी उपस्थित होते


Recent Comments