न्यूट्रल स्थितीतील बोलेरो गाडी अचानक रिव्हर्स स्थितीत सुरु झाली , गाडीमागे दुचाकीवर असलेले दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून अनेक गाड्यांचे नुकसान झाले .
व्हॉइस ओव्हर : ही घटना बेळगावच्या मारुती गल्लीत घडली . बोलेरो चालक आपली गाडी न्यूट्रल करून खाली उतरून गेला होता .
काही वेळातच ही गाडी रिवर्स स्थितीत सुरु झाली . या बोलेरोच्या मागे , दुचाकीवर दोघे थांबले होते .
त्यांना या बोलेरोची धक्का बसल्याने ते खाली पडून जखमी झाले . शिवाय अनेक गाड्यांचाही देखील नुकसान झाले . अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाने पादचाऱ्यांसहित , वाहनधारकांची तारांबळ उडाली .


Recent Comments