खानापुर तालुक्यातील गुंडुपी गावातील सबा मुजावर नामक महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत तिची आई बसेरा साहेबखान यांनी नंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . सबा मुजावर हिला तिचा पती मुजाहिद्दीन मुजावर, सासरा शब्बीर मुजावर, सासू दिलाशाद मुजावर यांनी , नीट स्वयंपाक येत नाही म्हणून त्रास देत होते . तिला कुठेही बाहेर जाऊ दिले जात नव्हते . या त्रासाला कंटाळून , सबा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तिने माहिती दिली .
नंदगड पोलिसांनी पती मुजाहिद्दीन मुजावर व सासरा शब्बीर मुजावर यांना अटक केली आहे . नंदगड पोलीस अधिक तपस करीत आहेत


Recent Comments