खानापूर तालुक्यातील शेतकरी आपल्या जमिनीत पिके घेण्यासाठी मेहनत घेत आहेत, मात्र वन्य प्राणी येऊन शेतकऱ्यांचे सर्व पीक खाऊन नष्ट करीत आहेत .शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार माहिती विभागाकडे केली असता हजारो रुपयांची नुकसान भरपाई मागतात, पण ती वेळेवर मिळत नाहीत.


आज मस्केनट्टी गावातील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा बेंडीगेरी यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक 30 मधील शेतात , हत्तींनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने गोळीहल्लीच्या संबंधित झोन वन अधिकाऱ्यांनी खंदक बांधून हत्तीच्या उपद्रवावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अर्ज दाखल केला.


शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर शेतकर्यांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा हीच अपेक्षा आहे. यावर अधिकारी काय कारवाई करतात ते पहावे लागेल.


Recent Comments