Belagavi

वार्ड क्रमांक 33 व 34 मध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी नवीन गाडी मंजूर

Share

वार्ड क्रमांक 33 व 34 मध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी नवीन गाडी मंजूर करून घेण्यात आली आहे . आता यापुढे दररोज कचऱ्याची उचल केली जाणार आहे .

वार्ड क्रमांक 33 व 34 मध्ये घरोघरी जाऊन कचरा घेण्यासाठी गाड्या कमी होत्या घरातील कचरा आठवड्यातून फक्त तीन वेळा उचल होत होती त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते व नागरिकांची तक्रार ओळखून बेळगावच्या उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील यांनी लक्षात घेत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून नवीन गाडी मंजूर करून घेतली
आज बुधवार दिनांक

5 जुलै रोजी त्या गाड्यांची पूजा करून नागरिकांच्या सेवेसाठी सुरुवात करण्यात आली आता लवकरच रोज कचरा घेऊन जायची व्यवस्था करण्यात येणार आहे तरी नागरिकांना विनंती केली आहे की कचरा रस्त्यावर न टाकता कचरा गाडी मध्ये द्यावा व सफाई कामगारांना सहकार्य करावे अशी विनंती उपमहापौर व 34 चे नगरसेवक श्रेयस नाकाडी व इतर नागरिकांनी सांगितले ह्यावेळी नगरसेवक श्रेयस नाकाडी, समाजसेवक प्रवीण पाटील ,महिला वर्ग व नागरिक उपस्थित होते

Tags: