.दीपक मल्लाप्पा पाटील, शिवाजी गल्ली, गौडवाड. येथील दीपक यांना पहिला पासून मिलिटरी मधे जायची इच्छा होती, त्यांचे प्राथमिक आणी माध्यमिक शिक्षण गौडवाड येथील मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे मुतगा गावात महाविद्यालायीन शिक्षण पूर्ण केले.
मराठी मधे शिक्षण घेऊन दिपक यांनी 28 फेब्रुवारी 2002 ला उटी येथे मद्रास रेजिमेंटल सेंटर मधे भरती झाले. आज 21वर्षानंतर त्यांना मद्रास रेजिमेंटल सेंटर च्या 18मद्रास युनिट च्या ज्युनिअर कमांडर ऑफिसर जे. सि. ओ पदी बडती मिळाली असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
आज त्यांनी जेसिओ चा पदभार स्वीकारला असून अजून 7वर्षे ते सेवा बजावणार आहेत. दीपक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ते सध्या दिल्ली येथील 18 मद्रास युनिट च्या सेंटर मधे सेवा बजावत आहेत


Recent Comments