जून महिना संपत आला तरी यंदा मॉन्सूनच्या पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र-कर्नाटकात हाहाकार माजला आहे. त्यामुळे जुन्या परंपरेनुसार कुठे देवाला पाण्यात कोंडणे तर कुठे गाढवाचे लग्न लावणे अशा प्रथा पाळत वरुणरायाची प्रार्थना करण्यात येत आहे.

होय, बिपोरजॉय वादळामुळे यंदा देशात मॉन्सूनचे आगमन लांबले आहे. विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्रात पावसाअभावी लोक त्रस्त झाले आहेत. पावसासाठी देवाचा धावा करूनही पाऊस काही येत नाहीय. तरीही लोक पारंपरिक प्रथा पाळत, विविध विधी करून पावसाची करून भक्त आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी आणि कित्तूर येथे लोकांनी देवाची अशीच पारंपरिक प्रार्थना केली. कृष्णा नदीच्या काठावरील अथणी तालुक्यातील संबरगी गावात ग्रामस्थांनी गाढवांचे लग्न लावले. पारंपरिक पद्धतीने गाढवाला नवरदेवाप्रमाणे सजवून त्याचे लग्न लावण्यात आले.
मलप्रभा नदीच्या काठावर असलेल्या कित्तूर येथील सूर्यदेवालाही पाण्यात कोंडण्यात आले. सूर्यदेवाची अर्धी मूर्ती पाण्यात बुडेल अशा पद्धतीने मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी ओतून गाभाऱ्याच्या दरवाजाला टाळे ठोकण्यात आले. फ्लो
पाऊस न झाल्याने अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे खेडेगावातील नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. मलप्रभा, घटप्रभा नद्या कोरड्या पडल्याने हिडकल आणि राकसकोप जलाशयांची पातळी मृत साठ्यापर्यंत घसरली आहे. बेळगाव शहराला राकसकोप जलाशयातून पाणीपुरवठा होतो. मलप्रभा जलाशयातून बेळगाव, हुबळी आणि धारवाडला पाणीपुरवठा होतो. घटप्रभा जलाशयातून बेळगाव, बागलकोट जिल्ह्याना पाणीपुरवठा केला जातो. कृष्णा नदीतून बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील लोकांना पाणीपुरवठा केला जातो. आता या तिन्ही प्रमुख नद्या किनारे कोरड्या पडल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार लवकर पाऊस न पडल्यास पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता ठळक आहे. बेळगाव जिल्ह्यातील काही गावात आधीच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी आठवडाभरात पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल असा अंदाज आहे.


Recent Comments