पाऊस लांबल्याने घटप्रभा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे नदीचे पात्र ओलांडून उसाच्या शेतात घुसलेली भलीमोठी अजस्त्र मगर ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्याने पकडल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील उदगट्टी गावात घडली. मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

होय, मुडलगी तालुक्यातील उदगट्टी गावच्या शिवारातील एका शेतात उसाच्या फडात एक भली मोठी मगर आढळून आले. घटप्रभा नदी मुडलगी तालुक्यातील उदगट्टी गावातून जाते. सध्या लांबलेल्या पावसामुळे घटप्रभा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे नदीतील मगर नदीशेजारील उसाच्या शेतात शिरली. एका शेतकऱ्याने ती पाहिली.
त्याने लगेचच ग्रामस्थांना याची माहिती दिली. शेतीच्या कामात गुंतलेल्या शेतकऱ्यांनी प्रचंड आकाराची मगर पकडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतात ठाण मांडून बसलेल्या मगरीला स्थानिकांनी दोरी आणि जेसीबीच्या सहाय्याने पकडले.
त्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिकांनी मगरीला ताब्यात घेतले. मगरीला पाहण्यासाठी उदगट्टी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


Recent Comments