Belagavi

गोहत्या बंदी कायद्यात सुधारणा झाली पाहिजे : माजी मंत्री विनय कुलकर्णी

Share

बेळगाव सरकारी विश्रामधामात रविवारी पत्रकारांशी बोलताना विनय कुलकर्णी म्हणाले की, गोहत्या बंदी कायद्याबाबत बोलणाऱ्या कोणाही भाजप नेत्याच्या घरी गाय नाही. राज्यात सर्वाधिक गुरे पाळणारा मी आहे. गोहत्येबाबत जनजागृती करा, शेतीत बैलांचा वापर आता होत नाही. आता सर्व कापणी यंत्रे शेतीत आली आहेत. गायी वृद्ध झाल्यावर काय करायचे? गायीच्या देशी जाती टिकवण्यासाठी काम करायला हवे, असे ते म्हणाले.

गायीच्या नावावर राजकारण करणार्‍यांचे सोडा, करोडोंची गुंतवणूक करून मी गायींना पाळतो आहे. गोहत्या बंदी कायद्यात सुधारणा करावी. गुरे व वासरे पाळणारे आणि शेतकरी यांना बोलावून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजपची अवस्था वाचाळवीरांसारखी आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. गेल्या पाच वर्षांत सत्ता भाजपकडे होती. कोरोनाच्या काळात त्यांनी काही केले का? त्यांच्यातही माणुसकी नव्हती का? गरीब आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही कोणती योजना आणली आहे का? भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे का? असा सवाल करत, काँग्रेस सरकारला प्रश्न करण्याची भाजपमध्ये नैतिकता नाही असे ते म्हणाले.

काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. काही निकष लावले आहेत. मोफत विजेबद्दल बोलताना भाजपने आता वापरल्या जाणाऱ्या विजेवर 10 टक्के अधिक रक्कम दिली आहे.

आपल्या समाजातील नेते मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत. काँग्रेसमध्ये लिंगायत समाजाचे एकूण 37 आमदार निवडून आले आहेत. मंत्रिपद मिळाले नाही म्हणण्यापेक्षा येत्या काही दिवसांत पद मिळेल, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: