Belagavi

गॅरेजमध्ये शिरलेल्या नागराजाच्या पकडले

Share

बेळगावातील जुन्या भाजीमार्केटजवळील हरीकाका कंपाउंडमधील एका गॅरेजमध्ये शिरलेल्या नागसापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

जुन्या भाजीमार्केटजवळील हरीकाका कंपाउंडमधील एका गॅरेजमध्ये आज दुपारी एक नागसाप शिरल्याचे कर्मचारी आणि मालकाच्या लक्षात आले. त्यामुळे सगळ्यांची भीतीने गाळण उडाली.

त्यानंतर तातडीने सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. या सर्पमित्राने सापाला पकडून सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Tags: