निवडणुकीत घरोघरी वाटल्याप्रमाणे 5 गॅरंटी हमी योजना प्रत्येकाला देणे शक्य होणार नाही, आम्ही फक्त गरजू आणि गरीबांनाच ओळखून त्यांच्यापर्यंत हमी योजना पोहोचवू अशी माहिती नूतन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील बैलूर गावात सतीश जारकीहोळी यांचा मंत्रिपद मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले की, राज्यातील जनतेला आमच्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू. आम्ही हमीभाव पूर्ण करण्यास तयार आहोत, मात्र विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. आम्ही हमी दिली, त्यांनी नाही! हमी योजना पूर्ण व्हायला वेळ लागतो.

आराखड्याच्या अंमलबजावणीची पूर्वतयारी झाली आहे, आम्ही ती राबवू असे जारकीहोळी यांनी सांगितले. बाईट
एकंदर, राज्यातील प्रत्येकालाच 5 गॅरंटी हमी योजना देता येणार नसल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.


Recent Comments