संकेश्वरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हॉटेलवर मोठे झाड कोसळले. त्यामुळे लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने वेळीच बाहेर धाव घेतल्याने हॉटेल मालक बचावला.


सोमवारी रात्री मुसळधार पाऊस आणि उष्ण वाऱ्यामुळे संकेश्वर शहरातील शासकीय रुग्णालयाजवळील एका छोट्या हॉटेलवर मोठे झाड उन्मळून पडले. यावेळी हॉटेलमध्ये असलेल्या मालकाने धावत बाहेर पडून आपला जीव वाचवला.
या घटनेत हॉटेलमधील फर्निचर, टेबल, खुर्ची, स्वयंपाकघरातील भांडी असा लाखो रुपयांचा साहित्याचे नुकसान झाले आहे.


Recent Comments