Accident

अग्निशमन उपकरणात नायट्रोजन भरताना स्फोट; एक जखमी

Share

अग्निशमन उपकरणात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात नायट्रोजन वायू भरल्याने त्याचा स्फोट झाला. उपकरणाचा लोखंडी पत्रा वायू भरणाऱ्या कामगाराच्या पायावर आदळल्याने कामगार गंभीर जखमी झाला. त्याचबरोबर समोरील मोटारीची काच फुटली. भाग्यनगर पहिला क्रॉस येथे ही घटना घडली असून, टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.


भाग्यनगर पहिला क्रॉस येथील अन्नपूर्णा अपार्टमेंटमधील एका भाडोत्री गाळ्यात अग्निशमन उपकरणात नायट्रोजन वायु भरण्याचा व्यवसाय सुरू केला होता. नेहमीप्रमाणे मोठ्या सिलेंडरमधील नायट्रोजन अग्निशमन उपकरणांत भरले जात होते. यावेळी कामगाराने क्षमतेपेक्षा जास्त नायट्रोजन भरल्याने उपकरणाचा स्फोट झाला. यावेळी उपकरणाचा लोखंडी पत्रा पायावर आढळल्याने कामगार गंभीर जखमी झाला. त्याचवरोवर समोरील मोटारीवर जाऊन पत्रा आदळल्याने मोटारीची मागील काच फुटली.

 

दुपारच्या दरम्यान कानठळ्या बसणारा स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने गल्लीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी त्या ठिकाणी काम करणार कामगार गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे काहींनी त्याला तातडीने रुग्णालय दाखल केले. घटनेची माहिती समजताच टिळकवाडी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र, या प्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Tags: