अँकर : निवडणूक ड्युटीवर निघालेली बस उलटल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील हल्लूर क्रॉस येथे मंगळवारी ही घटना घडली.

बसचा एक्सल कापला गेला आणि नियंत्रण सुटल्याने बस उलटली. बसमधील १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. बसमध्ये आणखी 40 प्रवासी होते.

जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्रकरणाची माहिती मिळताच मुद्देबिहाळ निवडणूक अधिकारी चंद्रकांत पवार यांनी जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली.
सिंदगी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी नेण्यात येत होते .
मुद्देबिहाळ पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत ही घटना घडली आहे .


Recent Comments