कित्तूर मतदार संघात प्रचार करणाऱ्या आमदारांना ग्रामस्थांनी फैलावर घेतल्याची घटना कित्तूर मतदार संघातील चिक्कबागेवाडी गावात घडली.
कित्तूर मतदारसंघाचे आमदार महांतेश दोड्डगौडर यांचा चिक्कबागेवाडी प्रचार सुरु असताना विविध विषयांवर चर्चा सुरू असतानाच गदारोळ झाला. आमदार महांतेश दोड्डगौडर यांना ग्रामस्थांनी चांगलेच फैलावर घेतले. अनेक वर्षांपासून आमदार चिक्कबागेवाडी गावात येत नाहीत हे निंदनीय असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गावातील युवक शंकरगौडा यांच्या नेतृत्वाखाली आमदारांना ग्रामस्थांनी जाब विचारला. रस्ता, मलनिस्सारण, जलजीवन मिशन प्रकल्पांच्या कामात दिरंगाई होत असल्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी ग्रामदैवताचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करताच त्यांना घेरून ग्रामस्थांनी जाब विचारला. त्यामुळे त्यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला.
तत्पूर्वी आ. दोड्डगौडर यांनी शेकडो चाहत्यांच्या सोबतीने चिक्कबागेवाडी गावातील प्रत्येक घराला भेट देऊन मतांचा प्रचार केला. मात्र चिक्कबागेवाडी ग्रामस्थांनी कार्यकर्ते व नेत्यांसमोर त्यांचा पाणउतारा केला.


Recent Comments