Belagavi

कडोली रामनगर येथे श्री महालक्ष्मी जत्रा महोत्सव

Share

कडोली येथील रामनगर गल्लीतील (हालुमत) धनगर समाज बांधवांपैकी फक्त गावडे घराण्याच्या हक्काचे असलेल्या श्री महालक्ष्मी देवीचा जत्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिकतेने पार पडला .

केवळ गावडे घराण्याची देवी असली तरी संपुर्ण धनगर समाज बांधव,इतर समाजाच्या भाविक भक्त यामध्ये सहभागी होतात . जत्रमहोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी,मंडप,आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती . प्रथम श्री विठ्ठल बिरदेवची पालखी सहवाद्य श्री महालक्ष्मी मंदिराला आणल्यानंतरच जात्रामहोत्सवाला प्रारंभ झाला . नंतर यात्रा कमिटीच्या वतीने , ढोलवाद्यासह गावातील सर्व देवदेवतांची मानापनासह नारळ वाढवुन विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर महालक्ष्मी देवीचीही पुरोहिताकडून , अभिषेकसह विधिवत पूजा करण्यात आली .

जत्रामहोत्सवाच्या मुख्य धार्मिक विधिसह नैवेद्य अर्पण झाल्यानंतर भाविक भक्तांचे दर्शन,,ओटी भरणे व नारळ वाढविणे कार्यक्रम झाले.  नंतर झालेल्या महाप्रसाद कार्यक्रमाचा शेकडो भाविक भक्तांनी लाभ घेतला नंतर कांग्रेस पक्षाचे युवा नेता राहुल जारकिहोळी जात्रामहोत्सवामध्ये सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतल्यानंतर कमिटीतर्फे त्यांचा शाल व हार घालुन स्वागत केल्यानंतर कार्यक्रमाला उद्देशून त्यांनी मनोगत व्यक्त केले. आपले वडिल सतिश जारकिहोळी पक्षभेद व जातभेद बाजूला सारुन सदैव सर्व वर्गाच्या व सर्व क्षेत्रातील गरिब,दिन दलित,मागास विशेष करुन धनगर बांधवांच्या पाठीशी असुन सरकारच्या माध्यमातून आणि सतिश जारकिहोळी फौंडेशनच्या माध्यमातुनही समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वखर्चातुन अनेक उपक्रम राबवीत असुन त्याचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करुन घेण्याचे सांगून येणारी पाच वर्षे यमकनमर्डी विधानसभा क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे असुन मुख्यमंत्री सारखे एखादे मोठे पद त्यांना मिळणार असुन संपुर्ण राज्य व देशातच नंबर वन क्षेत्र बनविण्याचा मानस आहे . पुन्हा एकदा त्यांना आशिर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी केले.

नंतर केपिसिसि सदस्य मलगौडा पाटील बोलतांना स्थानिक आमदार व कांग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सतिश जारकिहोळी यांच्या कार्याचा आढावा घेताना आपल्या अनुदानातून , आजपर्यंत संपुर्ण कर्नाटकमध्येच कोणीही केले नाही इतका विकास केला असुन आपल्या सतिश जारकिहोळी फौडेशन व स्वखर्चातुनही सर्व वर्गातील व सर्व क्षेत्रातील गरिबानां मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहेत . राजकारणाबरोबर जनसेवा कार्य संपुर्ण राज्य व देशातच प्रशंसनीय असुन आज भाजप सरकार सर्व खाजगिकरण करुन श्रीमंतानाच श्रीमंत करित असुन जनतेकडून फक्तच काढून घेण्याचे काम करित आहे . कांग्रेस पक्षाच्या सर्व योजना तुमच्या घरपोच मिळणार, शिवाय कांग्रेस पक्षाने तुमच्या धनगर समाजाला प्राधान्य देऊन आपल्या समाजाला मुख्यमंत्रीपद दिले असता ते समर्थपणे विविध भाग्ययोजना राबवून संपुर्ण देशातीलच नंबर एकचे मुळ्यामंत्री व भविष्यातिल नंबर एकचे प्रधानमंत्रिही होण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असुन सतिश जारकिहोळी आणि सिद्धरामय्यांचे हात बळकट करण्यासाठी कांग्रेलाच पुन्हा आशिर्वाद करण्याचे आवाहन केले.

तर गजानन कागणिकर यांनी उपस्थित मान्यवरांसह सर्वांचे आभार मानले.व्यासपीठावर युवा नेते राहुल जारकिहोळी,केपिसिसि सदस्य मलगौडा पाटील, समाजाचे देवर्षी शिवाजी गावडे,माजी ग्रा.पं.अध्यक्ष राजु मायाण्णा,समाजाचे जेष्ठ राजु गावडे,कल्लाप्पा नरोटी,बिराप्पा शहापुरकरसह मान्यवर होते. नंतर हुक्केरी व अनगोळ संघांच्या धनगरी गाण्यांची रात्रजागरण झाली.

सकाळी परत सहवाद्य पालखी श्री विठ्ठल बिरदेव मंदिराला पोहचवल्यानंतर आणि सर्व पूजा साहित्य नदीमध्ये विसर्जन करुन विधिवत पूजा केल्यानंतर जत्रामहोत्सवाच्या सर्व धार्मिक विधीची सांगता झाली. जत्रामहोत्सवाच्या यशस्वितेसाठी यात्राकमिटी पदाधिकारी तसेच संपुर्ण हालुमत धनगर समाज बांधवानी परिश्रम घेतला.

Tags: