Belagavi

शांताई वृद्धाश्रमाचा २५ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य पायी दिंडी आणि रिंगण सोहळा

Share

बेळगाव येथील , बामणवाडीतील शांताई वृद्धाश्रमाचा २५ व्या वर्धापनदिनानिमित्त , पायी दिंडी तसेच माऊलींच्या अश्वाचे रिंगण पार पडले . अशी माहिती आश्रमाचे संचालक , विजय पाटील यांनी दिली .

ते म्हणाले कि , शांताई वृद्धाश्रमाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त , श्री संत वारकरी संघ , बामणवाडी ग्रामस्थ आणि शांताई वृद्धाश्रम यांच्या वतीने , एक दिवसाचा, पिरणवाडी येथील श्री सिद्धेश्वर मंदिर ते बामणवाडी येथील शांताई वृध्दाश्रमापर्यंत पायी दिंडी सोहळा पार पडला . यामध्ये मोठ्या संख्येनें वारकरी बांधव आणि भाविक सहभागी झाले होते. याबरोबरच संत पूजन , हरिपाठ ,कीर्तन , असा कार्यक्रम पार पडला .

शांताई वृद्धाश्रमाचे संचालक , माजी महापौर विजय मोरे यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले कि , शांताई वृद्धाश्रमाचा २५ व्या वर्धापन दिनानिमित्त , समाजाला आणि विद्यार्थ्यांना चांगला संदेश द्यावा यासाठी , या रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . इन न्यूजचे प्रधान संपादक राजशेखर पाटील यांच्या हस्ते या गोल रिंगण सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले . या रिंगण सोहळ्यासाठी , पिरणवाडी , बामणवाडी येथील वारकरी संघ तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले .

प्रारंभी ही पायी दिंडी आश्रमाच्या दाराशी आल्यावर माऊलीच्या अश्वाचे उभे रिंगण पार पडले . टाळ मृदूंगाच्या गजरात, विठोबा माऊलीच्या नामस्मरणात दंगलेल्या वारकऱ्यानी आणि उपस्थित भाविकांनी , प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर , डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा अनुभवला. आश्रमाच्या मागील बाजूस झालेल्या माउलींच्या गोल रिंगण सोहळ्याचे उदघाटन इन न्यूजचे प्रमुख संपादक राजशेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . या रिंगण सोहळ्यात , माउलींच्या अश्वाने सहा फेऱ्यांचे रिंगण केले . यावेळी मृदूंग आणि टाळांचा गजर करण्यात आला .

यावेळी , विकास पाटील , शांताई भरमा पाटील , विजय पाटील , नागेश चौगुले नागराज जाधव , कल्लप्पा पाटील , दिलीप चिटणीस , अजित हुक्केरी , अजित लोकूर , आणि अन्य निमंत्रित मान्यवर उपस्थित होते . यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला .

Tags: