सदाशिव नगर येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या विकासासाठी दिवंगत मंत्री सुरेश अंगडी यांनी आपल्या कार्यकाळात , एक कोटी रुपये अनुदान जाहीर केले होते . या कामकाजासाठी सन २०१९ -२० वर्षात , मंजुरी मिळाली . मात्र अद्याप या अनुदानाचा सर्मपक वापर न करता , लिंगायत स्मशानाचा विकास करण्यात आलेला नसल्याने , बेळगावमधील सर्व लिंगायत संघटनांनी आक्षेप घेऊन आपली तीव्र नाराजी व्यक्त केली . त्वरित कामकाज सुरु न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला .
बेळगावमधील सदाशिव नगरातील गणाचारी आणि कलमठ रुद्रभूमीच्या विकासासाठी , सरकारकडून एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत . २०१९-२० या आर्थिक वर्षात या कामकाजासाठी मंजुरी देखील देण्यात आली . मात्र आतापर्यंत या स्मशानांमध्ये विकासाचे कुठलेच चिन्ह दिसत नाही .

या संदर्भात , बेळगावमधील सर्व लिंगायत संघटनांनी एकत्र येऊन बैठक घेऊन चर्चा केली . यावेळी बेळगाव महानगर पालिकेचे आयुक्त आणि लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे लिंगायत स्मशानभूमीचा विकास झालेला नसल्याचे ताशेरे लिंगायत प्रमुखांनी ओढले . यासंबंधी आपली मराठीला माहिती देताना , लिंगायत नेते सुजित मुळगुंद यांनी सांगितले कि , गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या स्मशानभूमीच्या विकास कामासाठी भूमिपूजन करण्यात आले . आतापर्यंत या कामकाजचे ३ वेळा भूमिपूजन करण्यात आले आहे . परंतु इथे कुठलाच विकास झालेला नाही . कॉन्ट्रॅक्टर आणि मनपा आयुक्त अतिशय निष्क्रियतेने काम करत आहेत . यांची ह्या कामाप्रती इच्छाशक्तीच नाही असा आरोप त्यांनी केला . या स्मशानात कुठल्याच मूलभूत सोयीसुविधा देण्यात आलेल्या नाहीत . यासाठीच आम्ही सर्व लिंगायत संघटना आणि युवक एकत्र येऊन इथे चर्चा केली . आहे . महानगर पालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्याची या कामकाजाकडे दुर्लक्ष केले आहे . जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी तसेच कंत्राटदार बदलावा अशी मागणी त्यांनी केली . अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला .
तर जागतिक लिंगायत महासभेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष बसवराज रोटी यांनी सांगितले कि , बेळगाव महानगर पालिकेच्या व्याप्तीतील , गणचारी आणि कलमठ स्मशानभूमीच्या विकासासंबंधी आज बैठक घेऊन चर्चा केली आहे . स्मशानभूमीच्या विकासाकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षाबाबत , जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत . एक कोटी रुपयांचे अनुदान मंजूर होऊन देखील कामकाजाअभावी या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे . या अनुदानाचा समर्पक विनियोग करावा असे आवाहन त्यांनी केले.

तर लिंगायत नेते राजकुमार टोपण्णावर यांनी सांगितले कि, बेळगावमध्ये लिंगायत समाजाची लोकसंख्या जास्त आहे . आमच्या समाजाकडे , राजकीय , सामाजिक , आर्थिक दुर्ष्ट्या दुर्लक्ष करण्यात आलेले आहे . अनुदान मंजूर होऊन देखील लिंगायत समाजाच्या स्मशानाच्या विकासाकडे लक्ष देण्यात आलेले नाही . हे काम त्वरित सुरु करावे अशी मागणी त्यांनी केली .
तर नगरसेवक शंकर पाटील म्हणाले कि, लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी मंजूर झालेल्या अनुदानाविषयी , अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी उत्तरे दिली जात आहेत . या दोन्ही स्मशानभूमीचा विकास व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली .

एकंदर , दिवंगत सुरेश अंगडी यांनी अनुदान मंजूर करून देखील ,लिंगायत समाजच्या रुद्रभूमीचा विकासाकडे कानाडोळा करण्यात येत आहे . लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या इच्छशक्तीचा अभाव यासाठी कारणीभूत आहेत कि , मंजूर झालेला निधी इतरत्र वापरण्यात आला याबाबत लिंगायत संघटना साशंक आहेत . हे कामकाज त्वरित सुरु न केल्यास आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा तयारीत आहेत .
यावेळी सर्व लिंगायत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते .


Recent Comments