Belagavi

बेळगावात मोसमातील पहिल्याच वळवाची हजेरी

Share

बेळगावात आज मोसमातील पहिल्याच वळवाच्या पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला.
गेले काही दिवस बेळगावचा पारा चांगलाच वाढला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात तर अंगाची काहिली होत होती. या पार्श्वभूमीवर अवकाळी पाऊस व्हावा अशी अपेक्षा नागरिक करत होते. गुरुवारी सायंकाळीच आकाशात ढग दाटून आले होते. त्यामुळे पाऊस होईल अशी अशा होती. मात्र पावसाने हुलकावणी दिली.

त्यानंतर आज पहाटे ४.३० च्या सुमारास बेळगावच्या पश्चिम भागात वळवाच्या हलक्या सरी पडल्या.

त्यानंतर पुन्हा दुपारी ३.३० च्या सुमारास शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. काही ठिकाणी सखल भागात गटारी तुंबल्या.

Tags: