Belagavi

धारवाड ग्रामीण मतदारसंघातून विनय कुलकर्णींना काँग्रेसकडून तिकीट

Share

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून धारवाड ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी मंत्री विनय कुलकर्णी यांचे नाव निश्चित केले आहे.

आता विनय शिगमवी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची शंका दूर झाली असून हायकमांडनी विनय यांना धारवाड ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे यंदाही धारवाड ग्रामीण भागाची राजकीय लढाई रंगणार आहे.

विनय कुलकर्णींना धारवाड ग्रामीण मतदारसंघाचे तिकीट द्यावे, या मागणीसाठी विनयच्या चाहत्यांनी नुकतेच त्यांच्या घरासमोर उपोषण केले होते. या सगळ्यात आता विनय यांनी धारवाड ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे मान्य केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश आला आहे. विनय जिल्ह्याबाहेरून निवडणूक लढवणार की त्यांना धारवाड जिल्ह्यात येऊ देणार हे पाहणे बाकी आहे.

Tags: