संकेश्वरजवळील हिटणी फाट्यावर एका कारमधून नेण्यात येणारी 11लाख 49हजार रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे.
संकेश्वरजवळील हिटणी फाट्यावरील चेक पोस्टवर बुधवारी सायंकाळी सावंतवाडीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी एमएच 09 जेए 9439 क्रमांकाची कार अडवून नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता, त्यात 11लाख 49हजार रुपयांची बेहिशेबी रोकड आढळून आली, ती जप्त करण्यात आली. नागाळा पार्क, कोल्हापूर येथील रहिवासी कुशल अहुजा यांच्या मालकीची ही कार असून ते ही रक्कम घेऊन सावंतवाडी-गडहिंग्लज-संकेश्वर मार्गे कोल्हापूरला जात होते.
हिटणी चेक पोस्टवर तैनात पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी कारची तपासणी केल्यावर त्यांना ही रक्कम आढळली. तपासणीवेळी या रकमेसंबंधी कोणतीही कागदपत्रे आढळून आली नसल्याने ती जप्त करण्यात आली. हुक्केरी व संकेश्वर सीपीआय, व सहकारी तेच एसएसटी, एफएसटी पथकांनी ही कारवाई केली. या संदर्भात प्राप्ती कर खात्याला माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, कुशल अहुजा हे विजय टेक्स्टाईल्स नावाची कंपनी चालवत असून त्याशिवाय ते सिमेंट व्यापारी आहेत. सावंतवाडी, गडहिंग्लज, आजरा आदी भागात विकलेल्या सिमेंटच्या वसुलीसाठी ते आले होते असे समजते.


Recent Comments