Belagavi

निवडणूक आखाड्यात उडीसाठी आ. अभय पाटील सज्ज

Share

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेत अनेक इच्छुक आहेत. दुसरीकडे, बेळगाव दक्षिण मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार अभय पाटील आखाड्यात उडी घेण्याच्या तयारीत आहेत.

आ. अभय पाटील यांनी आज सकाळी बेळगावातील फोर्ट रोड येथील आपल्या कार्यालयात लक्ष्मी देवीची पूजा केली. एवढेच नाही तर प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या जीपचेही पूजन केले.

यावेळी आ. अभय पाटील यांचे बंधू व दक्षिण मतदारसंघातील भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.

Tags: