भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ने एनटीओ 3.0 सुधारित दर जाहीर केले आहेत. त्यामुळे विविध चॅनेल्सनी आपले दर वाढवल्याने केबल सेवेचे दर वाढविणे अपरिहार्य ठरले आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रा. लि.ने ग्राहकांवर कमीतकमी बोजा पडेल अशातऱ्हेने दरवाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रा. लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर नागेश छाब्रिया यांनी केले आहे.
बेळगावात बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रा. लि.चे एमडी नागेश छाब्रिया यांनी, दरवाढीमागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. ट्रायने केबलसेवेचे सुधारित दर जाहीर केल्याने स्टार, झी, सोनी, कलर्स, सन, डिस्कवरी, डिस्ने, टर्नर आदी बड्या ब्रॉडकास्टर्सनी गेल्या 1 एप्रिलपासून आपले दर वाढवले आहेत. ही दरवाढ करताना प्रादेशिक चॅनेल्सचे दर अधिक वाढवलेले आहेत.
त्यामुळे आम्हालाही दर वाढवणे भाग पडले आहे. येत्या 7 एप्रिल पासून नवे दर पूर्णपणे अमलात येणार आहेत. दरवाढ करताना आम्ही ब्रॉडकास्टर्सशी चर्चा करून आमच्या केबल ग्राहकांवर कमीतकमी भार पडेल अशा पद्धतीने माफक दरवाढ केली आहे. ग्रामीण भागात प्रादेशिक चॅनेल्सना अधिक मागणी आहे. अमेझॉन सारखे ओटीटी ऍप्स प्रादेशिक चॅनेल्स देत नाहीत. कोविड व नंतरच्या काळात अन्य सेवांचे दर वाढले असले तरी केबलसेवेचे दर वाढलेले नव्हते. तरीही आम्ही ग्राहकांकडून कमीतकमी पैसे आकारून जास्तीतजास्त चॅनेल्स सेवा देऊन अधिक मनोरंजन देण्याचा प्रयत्न केलाय असे छाब्रिया म्हणाले.
नागेश छाब्रिया पुढे म्हणाले, गेल्या सुमारे 29 वर्षांपासून आम्ही कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदी राज्यांत माफक दरात ग्राहकांना केबल सेवा देत आहोत. काही ब्रॉडकास्टर्स चॅनेल्स (उदा. आयपीएल सेवा) मोफत देत असले तरी ते इंटरनेट मोफत देत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना इंटरनेटसाठी प्रतिदिन 18 ते 20 रुपये मोजावे लागतात. ट्रायने दर वाढवले असले तरी आम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी डायमंड पॅकसारख्या पॅक सोबत मोफत इंटरनेट सेवा सुद्धा देत आहोत. ग्राहकांनी आपणाला कोणती चॅनेल्स हवीत यासह मोफत इंटरनेट पॅकची केबल ऑपरेटरकडे मागणी करावी, त्यांना ते उपलब्ध करून देण्यात येईल. जिओपेक्षा आमची पॅक तुलनेत अत्यंत कमी वाजवी दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांनी याची नोंद घेऊन घाई-घाईत निर्णय न घेता अभ्यास करून आम्हाला पूर्वीप्रमाणेच यापुढेही सहकार्य करावे असे आवाहन मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रा. लि.चे एमडी नागेश छाब्रिया यांनी केले.
यावेळी बोलताना संतोष पर्वतराव यांनी ग्राहकांनी मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रा. लि.च्या ऑफर्सचा लाभ घेऊन दरवाढीच्या सहकार्य करण्याचे आवाहन केले. बाईट
यावेळी इन न्यूजचे प्रधान संपादक राजशेखर पाटील उपस्थित होते.


Recent Comments