कागदपत्रांशिवाय नेण्यात येणारे , सुमारे ४० लाख, ३३ हजार , ७२९ रुपये किमतीचे , सोन्या-चांदीचे दागिने नंदगड पोलिसांनी जप्त केले आहेत शिवाय ज्या वाहनातून हे दागिने नेण्यात येत होते ते वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे .
कोणत्याही बिलाविना हे दागिने हल्याळ येथून कक्केरी येथे आणले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. २१,२५,३०४ रु. किमतीचे 395.7 ग्रॅम सोने आणि 19,08,420 रुपये किमतीचची 8.065 किलो चांदी जप्त करण्यात आली. याव्यतिरिक्त १३ लाख रुपये किमतीची कार देखील जप्त करण्यात आली असून एकूण , 53,33,724 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर मतदारसंघात तपासणी करताना या कागदपत्रांविना घेऊन जात असलेल्या वस्तू आढळून आल्या. पोलिस निरीक्षक बसवराज लमाणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत नंदगड पोलिस स्टेशनचे एन.बी.बेलवडी, यू.बी.शिंत्रे, बी.एस.करविनकोप्प, आर.एस.डोली आदी कर्मचारी सहभागी झाले होते.


Recent Comments