बेळगाव महानगरामध्ये लिंगायत समाजाची मते जास्त असल्याने राष्ट्रीय पक्षांनी लिंगायत समाजाला बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदार संघात उमेदवारी दयावी अन्यथा आम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागेल असे लिंगायत संघटनांनी राष्ट्रीय पक्षांना सूचित केले आहे .
बेळगाव महानगर कार्यरत असलेल्या , राष्ट्रीय बसव दल , राष्ट्रीय बसव सेने , अखिल भारतीय वीरशैव महासभा , जागतिक लिंगायत महासभा , लिंगायत क्षेमाभिवृद्धी संघटना लिंगायत क्रिया समिती , लिंगायत संघटना , या सात संघटनांनी एकजुट होऊन , नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री अल्लमप्रभू स्वामीजींची भेट घेऊन , आशीर्वाद घेतला . यावेळी स्वामीजींनी , या सातही लिंगायत संघटनांनी एकी दाखवून, आपल्या समाजासाठी हाती घेतलेल्या कार्याला पाठिंबा दर्शवला . निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मठामध्ये बैठक अथवा पत्रकार परिषद घेऊ शकत नसले तरी , संघटना जो निर्णय घेईल त्याला आपण पाठिंबा देऊ तसेच जरी राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारी दिली नाही तरी लिंगायत समाजाकडून जो उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहील त्याला पूर्ण पाठिंबा देण्याचे स्वामीजींनी सांगितले .
स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन, मठाबाहेर माध्यमांशी बोलताना जागतिक लिंगायत महासभेच्या रत्नप्रभा बेल्लद यांनी सांगितले कि , बेळगाव महानगरामध्ये लिंगायत समाजाचे ८५००० हुन अधिक मतदार आहेत . बेळगाव उत्तर मतदार संघात लिंगायत मतदारांची संख्या जास्त आहे . त्यामुळे आम्ही राष्टीय पक्षांनी , आमच्या समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी अन्यथा सर्व संघटना मिळून बैठक घेऊन , पुढील निर्णय घेऊ असे सांगितले .
तर जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोटी यांनी सांगितले कि , बेळगाव महानगरातील सर्व लिंगायत , बसवपर संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी एकत्र येऊन , काही निर्णय घेतले आहेत . बेळगाव महानगरातील उत्तर मतदारसंघात , लिंगायत मतदारांची संख्या जास्त असल्याने , सर्व राष्ट्रीय पक्षांनी ,लिंगायत समाजाला प्राधान्य देऊन , उमेदवारी द्यावी ,आम्ही सर्व लिंगायत आणि बसवपर संघटना , आणि मतदार मिळून त्या उमेदवाराला निवडून आणू . लिंगायत समाजाला उमेदवारीपासून डावलल्यास पुढील काळात मोठा निर्णय घेऊ असा इशारा दिला .
तर शंकर गुड्स आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी , लिंगायत समाजाला विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी प्राधान्य न दिल्यास आम्ही भविष्यात योग्य धडा शिकवू असा इशारा दिला .
एकंदर बेळगाव महानगरात उत्तर आणि दक्षिण मतदार संघात. लिंगायत समाजाचे मताधिक्य असल्याने , राष्ट्रीय पक्षांनी लिंगायत समाजाच्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचे आवाहन समस्त लिंगायत संघटनानी केले आहे . राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारी न दिल्यास लिंगायत समाजाचा जो उमेदवार अन्य पक्षांकडून निवडणुकीसाठी उभा राहील त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . याला स्वामीजींनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे . आता राष्ट्रीय पक्ष उमेदवारीसंबंधी काय निर्णय घेतात हे पाहावे लागले .
यावेळी , इराण्णा देयन्नावर , सुजित मुळगुंद तसेच सातही लिंगायत संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते .


Recent Comments