Belagavi

चेन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेवर आयटी रेड !

Share

काँग्रेस नेते व्ही. एस. साधून्नावर यांचे वर्चस्व असलेल्या कित्तूर राणी चेन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेवर आयकर विभागाने छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या सुमारे 15 अधिकाऱ्यांकडून रात्रभर शोध घेण्यात आला.

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरातील एक अग्रगण्य सहकारी बँक असलेल्या कित्तूर राणी चेन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेवर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून चौकशी सुरु केली आहे. बेळगाव आणि गोव्यातील आयटी अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने हा छापा टाकला आहे. शुक्रवारी टाकलेल्या या छाप्यात सुमारे 15 अधिकाऱ्यांकडून रात्रभर बँकेच्या खात्यांचा शोध सुरू होता. बँक मॅनेजर इरण्णा नान्ननवर यांच्याकडून आयटी अधिकाऱ्यांनी बँकेच्या व्यवहारांची माहिती घेतली. आयटी अधिकाऱ्यांनी बँकेतील सुमारे २६२ लॉकर्सची तपासणी केली.

लॉकर असलेल्या ग्राहकांचीही आयटी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. आयटी अधिकाऱ्यांच्या छाप्यावेळी बँकेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी जमली.
काँग्रेस नेते व्ही. एस. साधून्नावर यांचे वर्चस्व यांचे कित्तूर राणी चेन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेवर वर्चस्व आहे.

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथे असलेल्या या बँकेवर काल रात्री छापा टाकण्यात आला. बेळगाव आणि गोवा विभागातील आयटी अधिकाऱ्यांकडून आजही तपासणी सुरू होती. आज दुसऱ्या दिवशीही सुमारे 15 अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. बँकेत लॉकर असलेल्या ग्राहकांचीही आज अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. छाप्याचा संपूर्ण तपशील अद्याप प्राप्त झालेला नाही.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर इन्कम टॅक्स विभागाने केलेल्या या कारवाईने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे

Tags: