शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर चौका दरम्यानच्या दुतर्फी मार्गावरील दुभाजकावर 3 बाय 3 आकाराची छोटी दुकाने,छोट्या व्यावसायिकांसाठी उभारण्यात आली आहेत. मात्र अद्याप या दुकानांचे वितरण , भाजी विक्रेत्यांना करण्यात आलेले नाही . लवकरात लवकर ही दुकाने भाजी विक्रेत्यांना देऊन त्यांना सोयीचे करावे अशी मागणी माजी नगरसेवक नेताजी जाधव तसेच विद्यमान नगरसेवक रवी साळुंखे यांनी केली आहे .
शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर चौका दरम्यानच्या दुतर्फी मार्गावरील दुभाजकावर देशातील टपरी बाजार उभारण्यात आला आहे. या टपरी बाजारासाठी 6 कोटी 59 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत शहापूर खडे बाजार मार्गावर रस्त्यावर भाजी विकणार्या छोट्या विक्रेतांना या ठिकाणी भाजी विक्रीची करण्यासाठी टपऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.सदर टपरी बाजाराचे काम पूर्ण होऊन तीन महिने उलटले तरीही अद्यापही या टपऱ्यांचे वितरण झालेले नाही.

शहापूर खडे बाजार मार्गावर भाजी विक्री करणाऱ्या 136 भाजीविक्रेत्यांना या ठिकाणी टपऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत . टपरी बाजारामुळे स्थानिक नागरिक अथवा व्यापाऱ्यांवर गंडांतर येणार नाही. याउलट देशात मॉडेल ठरणारा हा टपरी बाजार,स्थानिक व्यापाऱ्यांना उत्तेजना देणारा ठरणार असल्याची ग्वाही बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली आहे.
मात्र भाजी विक्रेत्यांना अद्याप ही टपरी दुकाने न मिळाल्याने , यासंबंधी आपली मराठीला माहीती देताना माजी नगरसेवक नेताजी पाटील यांनी सांगितले कि , ही दुकाने बांधून बरेच दिवस झाले आहेत ,मात्र याचा फायदा भाजी विक्रेत्यांना झालेला नाही . एवढा कि , सामान्यां बरोबरच , भाजी विक्रेत्यांना देखील याचा त्रास होत आहे . संबंधित विभागाकडून ,या भाजी विक्रेत्यांना ही दुकाने वितरित करावीत अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली .

तर नगरसेवक रवी साळुंखे म्हणाले कि , नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कल पर्यंत जे टपरी भाजी
मार्केट स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात आपले आहे त्याचा लाभ अजून भाजी विक्रेत्यांना झालेला नाही . या कडक उन्हामध्ये भाजी विक्रेत्यांचे हाल होत आहेत . आयुक्त , तसेच घालून , हे भाजी मार्केट सुरु करावे असे निवेदन त्यांनी केले .
तर गेल्या ३५ वर्षांपासून भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कल्लप्पा ढगे या महिलेने सांगितले कि ,ऊन असो वा पाऊस आम्ही या ठिकाणी भाजी विक्री करतो . मात्र आतापर्यंत आमची दखल कोणी घेतली नाही . ३५ ते ४० वर्ष इथे उन्हातान्हात व्यवसाय करतो . आता ही दुकाने बांधली ती कोणाला देतात आणि कोणाला नाही हे माहित नाही . आम्हाला एखादे दुकान दिले तर बरे होतेय असे तुला म्हणाल्या .
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मतदार संघात अनेक विकास कामांचे आणि प्रकल्पांचे धडाक्यात शुभारंभ होत असताना, दुभाजकांवरील टपरी बाजार अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. याबद्दल नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


Recent Comments