खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीत खोडा घालून बेकी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यापुढे कुठेही असा प्रकार झाल्यास खपवून घेतला जाणार नाही. असा कडक इशाराही देण्यात आला आहे.
मध्यवर्तीच्या बैठकीत खानापूर येथील समितीत बेकी करण्याचा प्रयत्न करणार्यां बाबत चर्चा झाली. यावेळी मनोहर किणेकर यांनी समितीने एकत्र येऊन एकच उमेदवार द्यावा अशी लोकांची तीव्र भावना आहे. म्हणून खानापूर समितीत कार्यरत असतानाही काहींनी दुही करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी गद्दारी करणाऱ्यांना घरा बाहेर पडू देऊ नका. त्यासाठी गद्दार विरोधी सेना सुरू करावी. घटक समितीत काही पेच निर्माण झाला झाला तर तो सोडवण्याचा आणि पाठपुरावा करण्यासाठी मध्यवर्तीने प्रयत्न करावा असे मत मांडले.
खानापूरचे यशवंत बिरजे आणि गोपाळ देसाई यांनीही त्या घटनेचा निषेध करत आम्ही जोमाने काम सुरू ठेवले असल्याचे सांगितले.
मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी आणि न्यायाची लढाई जिंकण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्या चार पारंपरिक मतदारसंघांबरोबरच निपाणी आणि यमकनमर्डी या आधीच्या हक्काच्या मतदारसंघातही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेळगाव ग्रामीण, बेळगाव दक्षिण,बेळगाव उत्तर, खानापूर, निपाणी, आणि यमकनमर्डी अशा सहा मतदारसंघात समिती निवडणूक लढवणार आहे.मध्यवर्ती समितीच्या बैठकीत सदैव निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा मंदिर येथे पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी उपस्थित होते. या बैठकीत खानापूर तालुका समितीत दुही माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी होणार नाही याची दक्षता घटक समितीने घ्यावी आणि निष्ठावंत इच्छुक उमेदवारांना आपल्या मतदारसंघात निवडणूक उमेदवारी जाहीर करावी. उमेदवार निवडीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी असा निर्णयही घेण्यात आला.


Recent Comments