Belagavi

कडोलीत कर्जाला कंटाळून एकाची आत्महत्या

Share

कर्जाला कंटाळून पेंटरने दारूच्या नशेत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कडोली येथे घडली आहे.

सध्या येथील रामनगर गल्ली येथील रहिवासी मूळचा बुगडीकट्टी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथील बिराप्पा केंपाण्णा पुजारी वय (४२) याने आत्महत्या केली. तो सरकारी कन्नड हायस्कूलमध्ये वाचमन, प्युन तसेच बाहेर घर पेंटिंग काम करायचा. कर्जबाजारी झाल्यामुळे मानसिक नैराश्यातून दारूच्या नशेत अंबराईतील सरकारी कन्नड हायस्कूल जवळ गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचे उघड झाले. मंगळवारी रात्री अकरानंतर पुजेरी गायब झाला होता.

शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास आंब्याच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकलेला आढळून आला. माजी महापौर यल्लाप्पा कुरबर, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष राजु मायाण्णा, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष दत्ता सुतार, माजी ग्रा. पं. सदस्य गजानन कागणिकर, काकती पोलीस स्टेशनचे पीएसआय चन्नबसप्पा, हवालदार विजय दोडमनी, लतीफ मुशापुरी व पत्नी कल्पना पुजारी आदींच्या उपस्थित पंचनामा करुन पोस्टमार्टमसाठी सिविल हास्पिटलला पाठवून देण्यात आला. त्यानंतर त्याच्या मुळगाव बुगडीकट्टी येथील स्मशानात अंत्यविधी करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी व एकुलता एक मुलगा आहे.

Tags: